Author / ekam

इतर सणांसारखेच नवरात्राचेही अनेक पैलू आहेत. जर याचा आंतरिक अर्थ घेतला तर आपण एका साधकाची आध्यात्मिक यात्रेचा क्रम व गति त्यात पाहू शकतो. साधकाच्या या यात्रेचे तीन सोपान मानले जाऊ शकतात आणि या तीन सोपानांचे प्रतिनिधित्व करतात दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती. हे तीन सोपान पार केल्यावर दहाव्या दिवशी जेव्हा लक्ष्याची प्राप्ती होते तो दिवस विजयादशमी […]

दिनांक 27 सप्टेंबर रोजी अम्मांचा 57 वा जन्मदिन सोहळा अमृतपुरीच्या पैलतीरावरील अमृता विश्वविद्यापीठाच्या प्रांगणात भव्यदिव्य स्वरूपात साजरा झाला. आत्मज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान असलेल्या, जन्ममृत्यूच्या पार गेलेल्या अम्मा आपला या धरणीवरील अवतरणदिन साजरा करण्यास कधीच उत्सुक नसतात. पण या निमित्ताने जगभरातील सर्व जातीधर्मांचे लाखो लोक एकत्र येऊन विश्वशांतीसाठी प्रार्थना करतात, समाजातील दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी निष्काम भावनेने प्रेरीत […]

माता अमृतानंदमयी मठ शाळा व सार्वजनिक स्थळांच्या स्वच्छतेची जबाबदारी घेणार अमृतपुरी, दिनांक 22 सप्टेंबर 2010 रोजी अम्मा (श्रीमाता अमृतानंदमयी देवी) म्हणाल्या की, “जर राज्य सरकारे व अन्य संस्थांनी सहयोग व सहकार्य केले तर माता अमृतानंदमयी मठ संपूर्ण भारतभरातील शाळा व सार्वजनिक स्थळांच्या स्वच्छतेची जबाबदारी घेण्यास तयार आहे. भारत विकास करीत आहे, असे म्हटले जात असले […]

न्यूयॉर्क 2000 “खरा बदल अंतःकरणातच घडायला हवा ” परिवर्तनाच्या मोठ्या आशाआकांक्षा मनी बाळगून आपण नव्या सहस्राब्दात पदार्पण केले आहे. परंतु नुसतेच वर्षदर्शक आकडे बदलले आहेत, मूलभूतपणे काहीच परिवर्तन घडलेले नाही. खराखुरा बदल तर आपल्या अंतःकरणातच घडून यायला हवा. कारण आपल्या अंतःकरणातून संघर्ष व नकारात्मकता काढून टाकली तरच आपण शांतीच्या प्रस्थापनेत खरीखुरी विधायक भूमिका बजावू शकतो. […]

“प्रेम हेच आपले सारतत्त्व, सत्यस्वरूप आहे. प्रेमाला जाती, धर्म, वंश किंवा राष्ट्रीयता अशासारख्या संकुचित सीमा नसतात. आपण सारेच प्रेमाच्या सूत्रात ओवलेले मणी आहोत.” – अम्मा