Category / सनातन धर्म

हिंदू धर्माला ‘सनातन धर्म’ असेही म्हटले जाते. याचे कारण असे की तो कोणत्याही देश-काळासाठी उपयुक्त आहे. तो संपूर्ण जगाच्या उत्थानासाठी शाश्वत सत्याची शिकवण देतो. सनातन धर्म सर्वसमावेशक आहे. त्यात भौगोलिक सीमा व संकुचित मनोवृत्तींसाठी कोणतेही स्थान नाही. ‘असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्माऽमृतं गमय।’ (हे परमात्मन् मला असत्याकडून सत्याकडे, अज्ञानरूपी अंधकारातून आत्मदर्शनरूपी ज्ञानप्रकाशाकडे, मृत्यूकडून […]

हिंदू धर्म सर्वांमध्ये दिव्यत्व पाहतो. समस्त चराचराला ईश्वराचे साक्षात रूप मानतो. हिंदू धर्माच्या दृष्टीने मानव व ईश्वर दोन नाहीत, ते भिन्न नसून एकच आहे. सर्व भूतमात्रांत ते दिव्य चैतन्य व्याप्त आहे. हिंदू धर्म आपल्याला शिकवितो की स्वप्रयत्नाने कोणीही अंतस्थ दिव्यत्वाची अनुभूती करून नराचा नारायण बनू शकतो. सृष्टी व स्रष्टा भिन्न नसून ईश्वर स्वतःच सृष्टीचे रूप […]

मंदिरात प्रवेश केल्यावर मनाला पूर्णपणे ईश्वरावर केन्द्रित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनातल्या मनात मंत्रजप करीत प्रदक्षिणा घालाव्यात. दर्शन झाल्यानंतर दोन्ही हात जोडून, डोळे मिटून उभे राहून एकाग्र चित्ताने गाभा-यातील देवरूप आपल्या मनःचक्षूंनी पहावे, ध्यान करावे. मंदिरात जाऊन केवळ बाह्य रूपाचे दर्शन करणे पुरेसे नाही. दररोज ईश्वरध्यानासाठी थोडा वेळ राखून ठेवला पाहिजे. यथासंभव मंत्रजप करीत रहावे. […]

सारंकाही चैतन्यस्वरूप आहे. मंदिर उपासनेच्या माध्यमातून सर्वांमध्ये त्या चैतन्याचे दर्शन करून सर्वांशी प्रेमपूर्वक व्यवहार करण्याचा व सर्वांची ईश्वरभावनेने सेवा करण्याचा मनोभाव प्राप्त केला पाहिजे. हा सर्वांना स्वीकार करण्याचा मनोभाव आहे. प्रश्न – जर ईश्वर सर्वव्यापी आहे तर मग मंदिरांची काय आवश्यकता आहे? अम्मा – सनातन धर्माचे हे वैशिष्ट्य आहे की तो प्रत्येक व्यक्तीच्या स्तरावर जाऊन […]

अनेकांसाठी ईश्वर आराधना एक अंशकालीन, पार्टटाईम कार्य असते, आपल्याला अशा पार्टटाईम भक्तीची नव्हे तर पूर्णकालीन भक्तीची आवश्यकता आहे. एखाद्या लौकिक इच्छेच्या पूर्तीसाठी केली जाणारी पूजा, प्रार्थना पार्टटाईम भक्ती प्रकारात मोडते. परंतु आपल्याला आवश्यकता आहे ती केवळ भक्तीसाठी भक्तीची. केवळ ईश्वर प्रेमाचीच इच्छा बाळगून त्यासाठीच प्रार्थना केली पाहिजे, सदैव ईश्वरस्मरण केले पाहिजे. सर्वांमध्ये ईश्वर पाहिला पाहिजे. […]