Author / ekam

आज मंदिरांत जाणा-यांची संख्या बरीच वाढली आहे. परंतु त्यानुरूप चांगल्या संस्कारांतही वाढ होत आहे असे म्हणणे मात्र कठीण आहे. याचे कारण असे की आज मंदिरात आपल्या संस्कृतीचे, संस्कारांचे ज्ञान देण्याची व्यवस्थाच अस्तित्वात नाही. आपण तत्व समजून, उमजून ईश्वरभजन करायला हवे. भिन्न देवी-देवतांच्या पृथक अस्तित्वावर विश्वास न ठेवता ही सर्व भिन्न देवरूपे त्या परम ब्रह्मचैतन्याचीच विभिन्न […]

मंदिरात प्रवेश केल्यावर मनाला पूर्णपणे ईश्वरावर केन्द्रित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनातल्या मनात मंत्रजप करीत प्रदक्षिणा घालाव्यात. दर्शन झाल्यानंतर दोन्ही हात जोडून, डोळे मिटून उभे राहून एकाग्र चित्ताने गाभा-यातील देवरूप आपल्या मनःचक्षूंनी पहावे, ध्यान करावे. मंदिरात जाऊन केवळ बाह्य रूपाचे दर्शन करणे पुरेसे नाही. दररोज ईश्वरध्यानासाठी थोडा वेळ राखून ठेवला पाहिजे. यथासंभव मंत्रजप करीत रहावे. […]

सारंकाही चैतन्यस्वरूप आहे. मंदिर उपासनेच्या माध्यमातून सर्वांमध्ये त्या चैतन्याचे दर्शन करून सर्वांशी प्रेमपूर्वक व्यवहार करण्याचा व सर्वांची ईश्वरभावनेने सेवा करण्याचा मनोभाव प्राप्त केला पाहिजे. हा सर्वांना स्वीकार करण्याचा मनोभाव आहे. प्रश्न – जर ईश्वर सर्वव्यापी आहे तर मग मंदिरांची काय आवश्यकता आहे? अम्मा – सनातन धर्माचे हे वैशिष्ट्य आहे की तो प्रत्येक व्यक्तीच्या स्तरावर जाऊन […]

अनेकांसाठी ईश्वर आराधना एक अंशकालीन, पार्टटाईम कार्य असते, आपल्याला अशा पार्टटाईम भक्तीची नव्हे तर पूर्णकालीन भक्तीची आवश्यकता आहे. एखाद्या लौकिक इच्छेच्या पूर्तीसाठी केली जाणारी पूजा, प्रार्थना पार्टटाईम भक्ती प्रकारात मोडते. परंतु आपल्याला आवश्यकता आहे ती केवळ भक्तीसाठी भक्तीची. केवळ ईश्वर प्रेमाचीच इच्छा बाळगून त्यासाठीच प्रार्थना केली पाहिजे, सदैव ईश्वरस्मरण केले पाहिजे. सर्वांमध्ये ईश्वर पाहिला पाहिजे. […]

प्रश्न – हिंदू धर्मात तेहतीस कोटी देवीदेवतांची आराधना केली जाते. वस्तुतः ईश्वर एक आहे की अनेक? अम्मा – हिंदू धर्मात ईश्वर अनेक नाहीत. हिंदू धर्मात एकाच ईश्वरावर विश्वास ठेवला जातो. एवढेच नाही तर हिंदू धर्म अशी घोषणा करतो की संपूर्ण ब्रह्मांडात ईश्वराहून भिन्न असे दुसरे काहीच नाही. दृष्यमान जगतातील ही सर्व भिन्नभिन्न नामरूपे ही त्या […]