अमृतपुरीत येण्यासाठी मार्गनिर्देशन
पुण्या-मुंबईकडून रेल्वेने येणा-यांनी मुंबईहून सुटणा-या नेत्रावती, मुंबई-कन्याकुमारी एक्सप्रेसने व नागपुर कडून येणा-यांनी केरळ, अहिल्या नगरी, कोरबा इत्यादी एक्सप्रेस गाड्यांनी येऊन कायमकुलम स्टेशनवर(12कि.मी.) उतरुन स्थानीय बस अथवा रिक्शा-टॅक्सीने वल्लिक्काव गावात उतरणे तेथून 10 मिनिटांचे अंतर पायी चालल्यानंतर पुलावरुन खाडी पार करुन आश्रमात येता येते.

अथवा कायम्कुलमवरुन स्थानीय बस, रिक्षा, टॅक्सीने ओच्चिरा गावात उतरणे. तेथून वल्लिक्कावकडे जाणारी बस लवकर मिळू शकते. काही अतिजलद रेल्वेगाड्या कायम्कुलम रेल्वेस्टेशनवर थांबत नाहीत. म्हणून त्या गाड्यांनी येणा-यांनी कोल्लम (35किमी दक्षिणेला) जंक्शनवर उतरुन बस वा टॅक्सीने अमृतपुरीत येणे सोयीस्कर पडते. आश्रमापासून जवळचा विमानतळ उत्तरेस कोचिन(110 कि.मी.)व दक्षिणेस त्रिवेन्द्रम.(120 कि.मी.

—-
भक्तगणांनी अमृतपुरीत दर्शनाला येण्यापूर्वी आश्रमात फोनवर किवा ई-मेलने चौकशी करावी. अथवा आश्रमाच्या वेबसाईटवर अम्मांच्या कार्यक्रमाची अद्ययावत माहिती पहावी ही विनंती.

फोन – (0476) 324 1066 (निवास)
E-mail: stay{at}amritapuri.org