Category / अम्मा उवाच

न्यूयॉर्क 2000 “खरा बदल अंतःकरणातच घडायला हवा ” परिवर्तनाच्या मोठ्या आशाआकांक्षा मनी बाळगून आपण नव्या सहस्राब्दात पदार्पण केले आहे. परंतु नुसतेच वर्षदर्शक आकडे बदलले आहेत, मूलभूतपणे काहीच परिवर्तन घडलेले नाही. खराखुरा बदल तर आपल्या अंतःकरणातच घडून यायला हवा. कारण आपल्या अंतःकरणातून संघर्ष व नकारात्मकता काढून टाकली तरच आपण शांतीच्या प्रस्थापनेत खरीखुरी विधायक भूमिका बजावू शकतो. […]

“प्रेम हेच आपले सारतत्त्व, सत्यस्वरूप आहे. प्रेमाला जाती, धर्म, वंश किंवा राष्ट्रीयता अशासारख्या संकुचित सीमा नसतात. आपण सारेच प्रेमाच्या सूत्रात ओवलेले मणी आहोत.” – अम्मा

“हा क्षण आपल्या अंतःकरणात प्रेम व करुणा जागविण्याचा आहे. ही वेळ आपल्या हृदयाने प्रार्थना करण्याची आणि हाताने कर्म करण्याची आहे. अशावेळी दुःखीकष्टी लोकांच्या सहाय्यासाठी आपले हात पुढे येवोत आणि अशाप्रकारे सहानुभूती आणि दयेचा दीप आपल्या अंतरात प्रज्वलित होवो.” — अम्मांचा नववर्षाचा संदेश, 2005