Author / amrita

ईश्वराचा आश्रय घेतला तर त्यात आपलाच लाभ आहे. आपण देवाला जे काही अर्पण करतो, ते आपल्या समर्पणाचे प्रतीक असते. अशा रीतीने आपल्यात समर्पणभाव विकसित होतो.

ओणम 23 ऑगस्ट 2010 माझ्या मुलांनो, ओणमचा सण भक्ताचे परमात्म्यात विलीन होण्याचे स्मरण करुन देतो. आपले मन समर्पित करुनच आपण भगवद्चरणी लीन होऊ शकतो. मन समर्पित करण्याचा काय अर्थ आहे? ज्या वस्तूत आपले मन अत्याधिक आसक्त असते, ती वस्तू देवाला अर्पण करणे म्हणजे आपले मन समर्पित करणे होय. आज आपले मन धनामध्ये सर्वाधिक आसक्त आहे. […]