Category / उपदेश

ईश्वराचा आश्रय घेतला तर त्यात आपलाच लाभ आहे. आपण देवाला जे काही अर्पण करतो, ते आपल्या समर्पणाचे प्रतीक असते. अशा रीतीने आपल्यात समर्पणभाव विकसित होतो.

प्रश्न : अम्मा, आम्ही देवाच्या सगुण रूपावर का ध्यान करावे? निर्गुण निराकार परब्रह्मावर ध्यान केले तर काय हरकत आहे? अम्मा :  बेटा, सत्य, प्रेम यासारख्या गुणांची तू एखाद्या रूपाविना कल्पना करु शकतोस का? ते शक्य नाही, कारण हे गुण निराकार आहेत. गुणांचा विचार करण्यासाठी आपल्याला एखाद्या वस्तूची जरुरी पडते की जिच्यात ती गुणवैशिष्टे स्पष्टपणे व्यक्त […]