दिनांक 27 सप्टेंबर रोजी अम्मांचा 57 वा जन्मदिन सोहळा अमृतपुरीच्या पैलतीरावरील अमृता विश्वविद्यापीठाच्या प्रांगणात भव्यदिव्य स्वरूपात साजरा झाला. आत्मज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान असलेल्या, जन्ममृत्यूच्या पार गेलेल्या अम्मा आपला या धरणीवरील अवतरणदिन साजरा करण्यास कधीच उत्सुक नसतात. पण या निमित्ताने जगभरातील सर्व जातीधर्मांचे लाखो लोक एकत्र येऊन विश्वशांतीसाठी प्रार्थना करतात, समाजातील दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी निष्काम भावनेने प्रेरीत […]